maratha reservation : “आरक्षण देण्याआधी मराठा समाजाला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “सर्वपक्षीय बैठकीत…”

maratha reservation : नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आरक्षणाची मागणी करत आहेत गेल्या चौदा दिवसापासून ते उपोषणालाही बसलेली आहेत. आणि त्यांना राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळत आहे. तर या आरक्षणाच्या विषयावरून विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे. तर या परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतलेली आहे. आणि त्या बैठकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमंशी बातचीती केलेली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले, मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे. परंतु ते कायद्याच्या चौकटीत राहिलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

maratha reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असे म्हणाले आहेत की मराठा समाजाला आरक्षण देणे आधी त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करणे गरजेचे असणार आहे. आम्ही त्यांना प्राधान्य देत आहोत आणि हे आमचं पहिलं काम असेल. त्या कामासाठी समर्पित समिती नेमण्यात आलेली आहे. आणि त्याच समितीमध्ये लोक काम करत आहेत. आणि त्यांनी असे सांगितलेले आहे की या कारवाईला थोडा वेळ लागेल. त्यांचे असे म्हणणे आहे की या संबंधित निर्णय घेण्यासाठी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. थोडा वेळ लागेल यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांना विनंतीवजा अहवाल केलेली आहे.

मराठा असाल तर येथे क्लिक करून पहा

maratha reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की आपलं सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूने असणार आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण पण द्यायचं आहे, पण त्यासाठी आपण कोणाची फसवणूक करू शकत नाहीत. आपला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत राहिला पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. या सह आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहोत. सामाजिकदृषट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या् मराठा समाज हा मागास असल्याचा सिद्ध करण्याचं काम करत आहोत. आपण जे देणार आहोत ते आरक्षण न्यायालयाच्या चौकटीत राहायला पाहिजे ही अशी सरकारची भूमिका आहे.

हे पण वाचा :-DA Hike Bulletin : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! वाढीव महागाई भत्ता;15,144 रुपयाने वाढणार पगार

Leave a comment