I PHONE 15 नमस्कार मित्रांनो I PHONE 15 आणि I PHONE 15 प्लस लाँच केलेले आहेत. यावेळी कंपनीने या सीरिजमध्ये डायनॅमिक आयलँडचाही वापर केलेला आहे, जो लहान आकाराचा नॉच आहे. आणि तो पास ही झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीने आयफोन 14 प्रो सीरिजमध्ये डायनॅमिक आयलँडचा वापर केला होता. चला जाणून घेऊया या दोन्ही हँडसेटची किंमत आणि फीचर्सबद्दल थोडी माहिती घेऊयात

I PHONE 15 सीरिज अंतर्गत आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस हे दोन हँडसेट लाँच केले आहेत. गेल्या वर्षी कंपनीने आयफोन १४ प्रो सीरिजमध्ये डायनॅमिक आयलँडचा वापर केलेला होता, तर आयफोन १४ मध्ये स्टँडर्ड नॉच होता.
I PHONE 15 मध्ये बॅक पॅनेलवर ड्युअल कॅमेरा सेटअप चा वापर करण्यात आलेला आहे. प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा आहे. अधिक चांगल्या तपशीलात फोटो क्लिक करता येतात, असा कंपनीचा दावा आहे. तसेच हा फोन फोटोला नेक्स्ट लेव्हलचा अनुभव देऊ शकतो. यामध्ये युजर्सला लाइट आणि डिटेल्सचा परफेक्ट बॅलन्स मिळेल.Next Genration Portrait मोड मिळणार आहे,यासोबतच नवीन फोकस मोड दिलेला आहे. तो फोकस मोड कमी प्रकाशात आणि दिवसाच्या प्रकाशात चांगले काम करेल. नवीन स्मार्ट एचडीआरमुळे चांगले फोटो क्लिक करण्यासही मदत होणार आहे.