बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान E-Peek Pahani

E-Peek Pahani नमस्कार शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीक पाहणी आता आपल्या मोबाईल ॲपच्या मदतीने तलाठ्याकडनं जाता स्वतःच्याच मोबाईलवरून आपल्या 7/12 वर विविध पिकाचे नोंदणी करता येते. राज्यभरात महसूल विभागाने ई-पिक पाहणी हा प्रकल्प 15 ऑक्टोबर 2021 पासून राबवण्यात आला आहे . या ई – पीक पाहणी आमच्या माध्यमातून मागील काय बऱ्याच वर्षापासून रब्बी हंगामामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे ई – पीक पाहणी करून आपल्या पिकाची नोंदणी करून शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे संघ स्थितीत सुरू असलेल्या खरीप हंगामाची ई – पीक पाहणी हे पण आपल्याला पूर्णपणे करायची आहे.

E-Peek Pahani तर मित्रांनो खरीप हंगाम 2023 पीक पाणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेट वर्जन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. तरीपण नवीन खातेदाराने शेतकरी नवीन वर्जन अपडेट करून घेणे गरजेचे आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई – पीक पाहणी मोबाईल द्वारे पिक पाहणी करण्यासाठी ची तारीख तुम्हाला 01 जुलै 2023 पासून सुरू करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनी, गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिव, बचत गट प्रतिनिधी, शेतकरी दूध उत्पादक संघ, पाणी फाउंडेशन गट, पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजक सेवक, तांत्रिक सहाय्यक, बँक प्रतिनिधी, शाळा कॉलेज विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी, सर्व ग्रामपंचायत समिती पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, मीडिया प्रतिनिधी, व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी सुद्धा शासनाच्या महत्त्वकाशी असलेल्या ई – पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी करण्यासाठी प्रोत्सहीत करावेत.

E-Peek Pahani तरी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींना एक आव्हान करण्यात येत आहे की 2023 खरीप हंगाम साठी दिलेल्या कालावधीमध्ये तुमची ई – पीक पाहणी नोंदणी पूर्णपणे करून घ्यावी जेणेकरून की शासनाचे पुढील काही विविध योजना, पिक विमा, पिक कर्ज, शासकीय अनुदान ई. अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. तुमच्या संबंधित तालुका निहाय हेल्पलाइन च्या माध्यमातून तुम्हाला सकाळी 08 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत ई – पीक पाहणी करताना तुम्हाला जर काही शंका अडचणी आल्या तर तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क करून आपल्या शंका व अडचणी विचारू शकता.

(तालुका हेल्प डेस्क क्रमांक)

बीड: 8805247773

गेवराई व शिरूर: 9763498955

परळी:9623004589

पाटोदा व आष्टी: 8766775452

माजलगाव धारूर वडवणी 9890456062 अंबाजोगाई 9096591991

बीड जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाची ई – पीक पाहणी पूर्णपणे करण्यासाठी विविध घटकाचा सहभाग घ्यावा तसाच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनीई – पीक पाहणी या कामासाठी योगदान घ्यावे, असे आव्हान बीड जिल्ह्या च्या जिल्हाधिकारी मॅडम दीपा मुधोळ-मुंडे यांनी केलेले आहे.

हे पण वाचा:E-Peek pahani:आपली ई-पीक पाणी पाहणी यशस्वीरित्या पार पडली आहे का आत्ता चेक करा आपल्या मोबाईल वरती

Leave a comment