Crop Subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये विक्री केलेल्या कांद्यासाठी 350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता राज्य सरकारने.

Crop Subsidy : या अनुदान वाटपाचा पहिला टप्पा चा शुभारंभ बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. पहिला टप्प्यामध्ये आता तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी एवढा निधी ऑनलाईन वितरित करण्यात येणार आहे. उर्वरित अनुदान वाटप करण्यासाठी लवकर दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
10 कोटी पेक्षा जास्त मागणी
Crop Subsidy : दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेले जिल्हे पुणे, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहमदनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर या संपूर्ण जिल्ह्यातील पात्र किंवा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा हजार रुपये पर्यंत अनुदान जमा होईल. आणि ज्या शेतकऱ्याचे किंवा लाभार्थ्याचे दे एकदा हजार रुपये पेक्षा जास्त असेल किंवा आहे त्यांनाही पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार रुपये असे अनुदान मिळेल.